मनोगत
‘आजचा सुधारक’चा हा अंक वाचकांपुढे आणता आला, ह्यामागे एक सुरस पार्श्वभूमी अशी… कुठल्याही अंकासाठी एरवी महिनाभर आधी पाठवले जाणारे आवाहन ह्यावेळी पाठवलेच गेले नाही. माणूस आहे, चुका होणारच, असे म्हणून सोडून देता येत असले तरी वाचकांप्रति उत्तरदायित्व तर असतेच. तेव्हा दहा दिवसांच्या मर्यादित काळात जे लेख येतील, ते घ्यावे आणि लेखांची संख्या अगदीच कमी वाटली, …